कोरोनाच्या लढ्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराकडून 2 कोटी रुपयांची मदत

1051

कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर मदतीसाठी पुढे आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड कोटी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे 50 लाख अशी एकूण 2 कोटी रुपयांची मदत देणार असल्याचे देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.

संपूर्ण जगावर कोरोना (कोविड-19) विषाणूचे संकट आले आहे. देशातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन संपुर्ण देशात जारी केला आहे. कोराना हा आज पर्यंतचा सगळ्यात मोठा संसर्गजन्य विषाणू असुन, तो झपाटयाने पसरत आहे. जिल्ह्यात या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय, महानगरपालिका, जिल्हा पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल यंत्रणा गतीमान झाल्या आहेत.

या जागतिक संकटावर मात करणेसाठी सर्व स्थरातून मदत केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून देवस्थान व्यवस्थापन समिती कडुन मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये दीड कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवाय ग्रामीण व नागरी आरोग्य व्यवस्थेसाठी 25 लाख आणि छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयासाठी 25 लाख रुपयांची मदत ही करण्यात येणार आहे. ही 50 लाखाची मदत लवकरच येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचेही देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या