पी. एन. पाटील यांच्यासह मुलगा-मुलीवर गुन्हा दाखल, 1 कोटीची मागणी केल्याचा सुनेचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनेला शिवीगाळ करून मारहाण करीत एक कोटीची मागणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे विद्यमान आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील ऊर्फ पी. एन. पाटील यांच्यासह मुलगा व मुलीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील ऊर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आदिती राजेश पाटील यांनी फिर्याद  दिली आहे. माहेरहून एक कोटी रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी आदिती यांचा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. तसेच फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशा प्रकारच्या विविध कलमांन्वये संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, लग्नाला पाच वर्षे झाली असून, दोन वर्षांपासून सून तिच्या माहेरी कराडलाच आहे. त्यामुळे तिचा छळ करण्याचा आणि गाडी, पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही. ती आमची संस्कृती नसल्याचे स्पष्टीकरण आमदार पी. एन. पाटील यांनी दिले आहे.