कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटतेय, आज 334 कोरोनाबाधितांची नोंद

जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या नव्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या गेल्या चार-पाच दिवसांपासून चांगली घटत चालल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. हजारात सापडणारे रुग्णसंख्या रोडावली आहे. गेल्या चोवीस तासांत ३३४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधीतांची संख्या ४३ हजार ७७७ वर पोहोचली आहे.

चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्या ४३४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ३२ हजार ७४९ कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.शिवाय गेल्या चोवीस तासांत २३ जणांचा व आतापर्यंत १ हजार ३९८ बाधीतांचा मृत्यू झाला असुन सध्या एकूण ९ हजार ६३० पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

जिल्ह्यात आज सर्वाधिक कोल्हापूर शहर- ५९, इंचलकरंजीसह नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात -५३, करवीर-३५, हातकणंगले-३२, गडहिंग्लज व आजरा प्रत्येकी-२१, कागल-२०, चंदगड १९, पन्हाळा-१८ तर शिरोळ तालुक्यात २२ असे नवे कोरोना रुग्ण आढळले.

आपली प्रतिक्रिया द्या