पडखंबे लघु पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना 7 कोटी 30 लक्ष रुपयांची नुकसान भरपाई मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुदरगड तालुक्यातील पडखंबे येथे जलसंधारण महामंडळाकडून ल.पा.प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतू प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यशासनाकडून खासबाब म्हणून 7 कोटी 30 लक्ष रुपयांना निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

पडखंबे ल.पा.तलाव हा गेल्या 10 ते 15 वर्षापासून निधी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमीनी बुडीत होण्याच्या प्रश्नामुळे प्रलंबित होता. परीणामी सदर प्रकल्प सन 2013 साली रद्द करण्याची शिफारस जलसंधारण महामंडळाकडे करण्यात आली होती. परंतू आमदार प्रकाश आबिटकर यांनी 2014 साली पडखंबेसह प्रंचक्रोशीसाठी महत्वपुर्ण असणाऱ्या या प्रकल्पास रद्द न करता सुधारीत प्रशासकीय मान्यता‍ मिळणेकामी शासनस्तरावर पाठपुरावा करून तत्कालीन जलसंधारण राज्यमंत्री विजयजी शिवतारे यांचेकडे वेळोवेळी घेतलेल्या बैठका व केलेल्या पाठपुराव्यामुळे याप्रकल्पास 14 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतू प्रकल्पाचे काम सुरू करण्यामध्ये प्रमुख अडसर असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बाधीत होणाऱ्या जमीनींकरीता मोबदला मिळणे गरजेचे असल्यामुळे याबाबत नुकसान भरपाई मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.