इचलकरंजी, गडहिंग्लज येथे उद्धव ठाकरे यांच्या आज झंझावाती सभा

uddhav-thackeray-sambhajinagar

सामना प्रतिनिधी। कोल्हापूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या तीन सभांच्या झंझावाताने पश्चिम महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. उद्या शनिवार शिवसेना-भाजप महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजी श्रीमंत घोरपडे नाटय़गृह चौकात सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली.

कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली.