कोल्हापुरात झाडांची कत्तल, वृक्षलागवड मोहीमेचा बट्याबोळ

कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड येथील एस के पाटील महाविद्यालयाअवती भोवती असणाऱ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडे तोडण्याची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती तसेच कुठलीही पूर्वसूचना  न देता झाडे तोडली गेली.  झाडे तोडणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन साधण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने वृक्षलागवडीची मोहीम हातात घेतली आहे. राज्य सरकारने गावा गावात  वृक्षलागवड मोहीम राबवली यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आणि वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याचे ठरवले आहे.

मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही होत असल्याचेही दिसून येत आहे. कुरुंदवाड येथे वृक्षाची संख्या मोठी होती, मात्र सध्या ही संख्या कमी होत चालली आहे.

पावसाळ्यात वादळाच्या तडाख्यात विविध ठिकाणी शेकडो वृक्ष उन्मळून पडतात.  तसेच नूसिंहवाडी-कुरुंदवाड ला जोडणाऱ्या मुख्य रस्ता रुंदीकरण नावाखाली शेकडो वर्षापुर्वीची झाडाची कत्तल करण्यात आली. त्यामुळे शहराकडे येताना सर्व परिसर ओस पडल्यासारखे वाटत असतानाच, कुरुंदवाड येथील एस के पाटील महाविद्यालयालगत असणाऱ्या पालिकेच्या हद्दीतील रस्ताकडेला असणाऱ्या झाडाची  झाडांची कत्तल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

झाडे तोडण्याची कुठलीही परवानगी घेण्यात अली नव्हती तसेच पूर्वसूचना न देता झाडे तोडली गेली. ही झाडे का तोडण्यात आली याची चौकशी व्हावी आणि गुन्हेगारांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या