
गुरे चरावयास घेऊन जाणाऱ्यावर गवा रेड्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज चिपळूण तालुक्यातील फुरूस गावात घडली. जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज दुपारी एक वाजता सतीश शांताराम जाधव (35) हे गुरे चरावयास घेऊन गेले असताना समोरून आलेल्या गवारेड्याने धडक दिली.गवारेड्याची शिंगे सतीश जाधव यांच्या पोटात घुसली.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.वनविभागाकडून वैद्यकीय उपचाराची मदत देण्यात आली आहे.





























































