कोकणच्या विकासासाठी रत्नागिरीत सागरी विद्यापीठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणच्या विकासासाठी रत्नागिरीत महाराष्ट्र ओशन ऍप्लाईड सायन्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात येणार आहे. या समुद्री विद्यापीठाच्या स्थापनेसाठी सागरी क्षेत्रातील तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा तीन महिन्यांत राज्य सरकारला अहवाल सादर होईल. बहुदा देशातील हे पहिलेच समुद्र शास्त्र्ा विद्यापीठ असेल असे अंदाज आहे.

महाराष्ट्राला 720 किमी लांबाची समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱयाला खाडय़ा, वाळूचे किनारे, कांदळवन, सागरी समृद्ध जैवविविधता लाभली आहे. समुद्रातून मासेमारीच्या माध्यमातून रोजगार मिळतोच, पण वाहतूक व पर्यटनासाठीही उपयोग होतो. लाखो लोकांना रोजगार व व्यवसायासाठी समुद्रकिनाऱयाला फायदा होतो, पण त्यासाठी लागणारे योग्य शास्त्र्ााrय ज्ञान, शिक्षण स्थानिकांना मिळत नाही. समुद्र शास्त्र्ा विषयावर उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण व संशोधन करण्यासाठी देशात एकही समुद्र शास्त्र्ा विद्यापीठ नाही. त्यामुळे समुद्र जीवशास्त्र्ा, समुद्र भूशास्त्र्ा, मत्स्यशास्त्र्ा तंत्रज्ञान, पर्यटन, पर्यावरणशास्त्र्ा व संवर्धन इत्यादी विषयांबाबतचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या विद्यापीठाची स्थापना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. एमटीडीसीच्या तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्कूबा डायव्हिंग ऍण्ड स्पोर्टस्चे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. सारंग कुलकर्णी हे या समितीचे अध्यक्ष असतील तर गोव्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियोनोग्राफीचे डॉ. नरसिंह ठाकूर, पुण्यातील पुणे कॉलेज ऑफ फार्मासीचे डॉ. बी. बी. चौगुले हे सदस्य तर पुण्यातील उच्च शिक्षण विभागाचे संचालक हे समितीचे सदस्य सचिव असतील. समुद्री विद्यापाठीच्या स्थापनेचा खर्च, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम, विद्यापीठातील विषय, शिक्षकांची पात्रता यासह अन्य काही विषयांचा अभ्यास करून ही समिती तीन महिन्यांत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.