
प्रतिनिधी । रत्नागिरी
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्यामुळे गाडी निवसर रेल्वेस्थानकात थांबली आहे. एक तास गाडी थांबल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
आज सकाळी कोकणकन्या एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकातून सवा सात वाजता सुटली. गाडी दीड तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना नियोजित ठिकाणी पोहचण्यास विलंब होणार हे निश्चित असताना निवसर रेल्वे स्थानकात कोकणकन्या एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. निवसर स्थानकात कोकणकन्या एक्सप्रेस साडे सात वाजता पोहोचली होती.





























































