कोपरगाव – चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात हातोडा घालून पतीकडून पत्नीचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव येथे चारित्र्याच्या संशयातून एका तरुणाने त्याच्या पत्नीची डोक्यात हातोडा घालून हत्या केली. ही घटना जेऊर पाटोदा शिवारात 19 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी पती अरुण रतन दाभाडे याला ताब्यात घेतले आहे.

अरूण दाभाडे हा त्याची पत्नी पुजा अरुण दाभाडे (वय 26 ) हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला सतत त्रास देत होता. सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास पूजा ही ड्युटीवरुनघरी जात असताना अरुण याने तिला रस्त्यात गाठून तिच्यावर हातोड्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. या प्रकरणी मयत पूजाचे आई वडील यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पती अरुण दाभाडे यांच्या विरोधात तक्रार दिला. त्यांच्या तक्रारीवरून अरुण दाभाडे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या हातोड्यासह अटक करण्यात आलेली आहे. तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पुढील तपास करीत आहेत