कोथरुड परिसरात जुगार अड्डयावर छापा, 35 जणांच्या विरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोथरुड परिसरातील जुगार अड्डयावर सामााजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत 35 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून 1 लाख 12 हजारांची रोकड, 35 मोबाइल  असा ऐवज  जप्त करण्यात आला.

 कोथरूड परिसरातील  जिजाईनगर परिसरात  पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर  पथकाने  छापा टाकून 35 जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, अजय राणे, प्रमोद मोहिते, मनीषा पुकाळे, नीलम शिंदे  यांनी केली.