झिंकची कमतरता आहे … हे १० पदार्थ खा.. बिनधास्त रहा

‘झिंक’. उत्तम आरोग्यासाठी, शरीराची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी शरीराला विविध प्रकारची आवश्यक आणि महत्वाचे पोषक घटक मिळणे खूप गरजेचे असते. आयर्न आणि कॅल्शिअमसोबतच आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी इतरही अनेक पोषकतत्वे गरजेची असतात. झिंक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, उत्तम त्वचेसाठी, जखमा लवकर भरून येण्यासाठी झिंक खूप मदत करते. सध्याच्या काळात शरीरातील झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी लोक अनेक महागडी औषधं घेत आहेत, मात्र आपल्या रोजच्या आहारात थोडा बदल केला, तर नैसर्गक पद्धतीने तुमच्या शरीरात झिंकचा समतोल राखला जाईल.

अंड्याचा पिवळा बलक
अंड्याच्या पिवळ्या बलकमध्ये मोठ्या प्रमाणावर कोलेस्ट्रॉल असल्याने सामान्यतः हा बलक खाण्यास मनाई केली जाते. मात्र आपल्या शरीरातील झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी हा बलक खूप उपयुक्त आहे. अंड्याच्या पिवळ्या भागात कॅल्शिअम, आयर्न, फॉस्फरस, थायमिन, जीवनसत्व बी६, फोलेट, जीवनसत्व बी १२ आणि पॅथोनिक अॅसिड असते.

शेंगदाणे
शेंगदाणे झिंकचा उत्तम आणि महत्वाचा स्रोत आहे. शेंगदाण्यामध्ये झिंकचे प्रमाणात जास्त असते. यासोबतच शेंगदाण्यांमध्ये आयर्न, जीवनसत्व ई, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फोलिक अॅसिड आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असते. शेंगदाण्यांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी असते.

काजू
काजू हा झिंकचा नैसर्गिक स्रोत आहे. काजूमध्ये जीवनसत्व अ , क, तांबे याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. हे हेल्दी कोलेस्ट्रोल वाढवते. यामुळे हृदयाच्या समस्या रोखण्यासही मदत होते.

दही
दह्यामुळे आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. यात जस्त देखील चांगल्या प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन डी असते. हे आपले हाडे मजबूत करण्यास मदत करतात. दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही उत्तम राहते.

ओट्स
भरपूर लोकं सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खातात. ओट्समध्ये देखील झिंकचे प्रमाण जास्त असते. सोबतच ओट्स फाइबर, बीटा-ग्लूकन, जीवनसत्व बी ६ आणि फोलेट्स यांचा सुद्धा उत्तम स्रोत आहे.

ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये लोह, अ व क जीवनसत्व, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात. ब्रोकोली खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होते.

लसूण
लसूणमध्येही झिंक मोठ्या स्वरूपात असते. रोज लसणाची एक कळी खाल्ली तर शरीराला अ, ब, क जीवनसत्व, आयोडीन, आयर्न, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांसारखी पोषक तत्वेही देखील मिळतील.

रेड मीट
झिंकचा सर्वात मोठा स्रोत, म्हणून रेड मीटचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या रेड मिटमध्ये बी १२ देखील जास्त असते. १०० ग्रॅम मीटमध्ये ४.८ मिलिग्रॅम झिंक असते. मीट हे हृदयासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

पालक
पालकात पुष्कळ पोषक घटक असतात. त्यात क जीवनसत्व आणि इतर अनेक अँटिऑक्सिडेंट्स आणि बीटा कॅरोटीन असतात. ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. पालक आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.