
सामना ऑनलाईन । मुंबई
रेल्वेच्या विशाखापट्टणम ट्रेनमध्ये एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे. सलमा शेख (३०) असं या महिलेचं नाव असून तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे.
घाटकोपर येथे राहणारी गर्भवती सलमा आपल्या कुटुंबीयांसमवेत प्रवास करत होती. कल्याणजवळ तिला प्रसुती कळा सुरू झाल्या. आरपीएफला ही गोष्ट कळवण्यात आल्यानंतर आरपीएफने त्वरित हालचाल करत नीलम गुप्ता आणि सुरेखा कदम या आपल्या दोन कॉन्स्टेब्ल्सना मदतीसाठी पाठवलं. या दोघींनी इतर महिलांच्या साहाय्याने सलमाला बाळंतपणात मदत केली. सलमा आता जुळ्या मुलांची आई झाली असून दोन्ही बाळे आणि बाळंतीण सुखरूप आहेत. त्यांना पुढील उपचार आणि देखभालीसाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.




























































