
शहरातील भाग्यनगर लक्ष्मी कॉलनी जुना औसा रोड भागातील घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 62 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सुधिर शंकरराव पोतदार खाजगी नोकरी, रा. भाग्यनगर लक्ष्मी कॉलनी जुना औसा रोड लातूर यांनी तक्रार दाखल केली. 8 ऑक्टोबर 2021 रोजी फिर्यादी हे घरात कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या दाराचे कुलूप तोडले. आत प्रवेश करून घरातील बेडरुममधील कपाटाचे लॉक तोडून आतील सामान अस्ताव्यस्त केले. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने पाच वर्षापुर्वी खरेदी केलेले एकूण किंमत 2,12,750 रुपये व रोख रक्कम 2,50,000 रुपये असा एकूण 4,62,750 रुपयांचा ऐवज लंपास केला. सुधिर पोतदार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.




























































