लातूर जिल्ह्यात 10 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले, आज 320 कोरोनाबाधित आढळले

corona-virus-new-lates

लातूर जिल्ह्यातील कोरोनाचे मिटर सुसाट झालेले आहे. आज उपचारादरम्यान १० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहिर केलेले आहे. तर नव्याने ३२० रुग्णांची भर पडलेली आहे. तसेच जिल्ह्यात १० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज भरमसाठ वाढत चाललेली आहे. पुन्हा नव्याने ३२० रुग्णांची वाढ झालेली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३४७१ वर पोहोचलेली आहे. उपचारादरम्यान १० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ३९२ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

सध्या जिल्ह्यात ३००२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज तब्बल ३८० रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत १००७७ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतलेले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर २.९ टक्के झालेला आहे. तर उपचाराने बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची टक्केवारी ७४.८० एवढी झालेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या