लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्येने 15 हजारचा टप्पा ओलांडला

लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्येने 15 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात नवीन 379 पाँझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. उपचारा दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा 447 झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. सप्टेंबर महिना सर्वाधिक रुग्ण संख्या वाढीचा ठरत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्याही वाढते आहे. जिल्ह्यात नवीन 379 बाधीत रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 15293 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 262 रुग्ण आज उपचाराने बरे झाले आहेत. तर आजपर्यंत 11772 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3074 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज सहा रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून आजपर्यंत 447 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या