
सामना प्रतिनिधी, लातूर
वलांडी परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली आहे. तर विजयनगर येथे वीज पडून एक गाय ठार झाल्याची माहिती देवणीचे तहसिलदार सुरेश घोळवे यांनी दिली.
वलांडी परिसरातील बोंबळी टाकळी देवगड अचवला दवणहिप्परगा दरेवाडी महादेववाडी या भागात पूर्व मोसमी पावसासह वादळाने शेतवस्तीसह ग्रामीण भागातील गावात नुकसान झाले आहे. विजयनगर येथील शेतकरी पंढरी काशीराम काकनाळे यांची देवणी जातीची गाय वीज पडून ठार झाली आहे.
वलांडी परीसरातील धनेगाव येथे वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे ऊडाल्याने येथील सिताराम बापूराव खारे यांच्या घरावरील पत्रे उडून पत्रावरील दगड घरात पडले. त्यामुळे घरातील फ्रीज, टीव्ही, कुलर यासह अन्नधान्यांचे नुकसान झाले आहे. तसेचन गावभागासह शेतशिवारातही नासधूस झाली आहे.




























































