कलावंत कधी निवृत्त होत नाही- साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देगलूर

राजकीय नोकरीत असणारे व्यक्ती काही कालावधीनंतर निवृत होतात तेव्हा त्यांना माजी म्हणून संबोधले जाते. पण कलावंत हा कलेच्या साधनेत सतत असतो तो निवृत्त होत नाही, असे मत साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी मांडले ते येथील पं.बाबूराव ऊप्पलवार यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी शिवसेना आमदार सुभाषराव साबणे होते. व्यासपीठावर यावेळी पं. श्यामराव गुजंकर होते कवी तांबोळी म्हणाले संगीत क्षेत्रात देगलूर परिसरात पं. बाबूराव उप्पलवार यांचे कार्य साधना मोलाची आहे. त्यांनी अनेक शिष्य निर्माण केले. त्यांच्याच हस्ते त्यांचा अमृतमहोत्सव होणे हे भाग्य म्हणावे, त्यांना आता पंडीत उपाधीही अलिकडेच त्याच्यासन्मानार्थ देण्यात आली हे ही त्यांचा सन्मान आहे; त्यांनी कलाप्रवासात वेगळी गायनशैली जपली आहे असा उल्लेख ही केला.

प्रारंभी डॉ. जगदीश देशमुख यांनी प्रास्ताविकात मला तबल्याचे प्राथमिक धडे दिल्याने मी घडलो त्यानी अनेक शिष्यांना घडविले आहे. त्यामुळेच आम्ही शिष्यांनी त्यांचा सन्मान करण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले. यावेळी सपत्निक पं. बाबूराव उप्पलवार यांचा शाल श्रीफळ पूर्ण आहेर मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर मनोगतात आपल्याबद्दल समजपेक्षा गैरसमज जास्त झाले पण कलावंतास एक टाळी पण प्रोत्साहित करते. अध्यक्षीय समारोपात आमदार साबणे यांनी यापंचक्रोशीत असा कलावंत नाही त्याची कलासाधना उल्लेखनिय आहे असे म्हटले.

या नंतर पं. श्यामराव गुजंकर यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला. या वेळी त्यांनी देश रागात छोटी बंदिश सादर केली व नंतर प्रसिद्ध ठुमरी क्या कहूँ सजनी आयेन बालम ने समारोप केला. यावेळी पं. उप्पलवार यांचे नातेवाईक उपस्थित होते.