Video – वाघाची मावशी आणि बिबट्या पडले विहरीत, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमध्ये मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहरीत पडल आहे. तसे छोटी मांजरही विहरीत पडली आहे. बिबट्या आणि छोटी मांजर दोघेही आमने सामने आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नाशिकच्या सिन्नरमध्ये एक बिबट्या मांजरीचा पाठलाग करत होता. तेव्हा मांजर आणि बिबट्या दोघेही विहिरीत पडले. स्थानिक नागरिकांनी जेव्हा विहिरीत पाहिले तेव्हा ते घाबरूनच गेले. त्यांनी तत्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्य़ांना पाचारण केले.


वनविभागाच्या कर्मचाऱ्य़ांनी मांजर आणि बिबट्याला सुखरुप काढले. दरम्यान बिबट्या मांजरीवर गुरगुरत होता. तेव्हा बिबट्या मांजरीला फस्त करतो की काय अशी भिती उपस्थितांना वाटली. परंतु बिबट्या हिंसक झाला नाही. अखेर वनविभागाने दोन्ही प्राण्यांना सुखरुप बाहेर काढले आणि बिबट्याला जंगलात सोडून दिले. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.