बिबट्याचा तरूणावर जीवघेणा हल्ला, हेल्मेटने केला प्रतिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरूणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रत्नागिरीत घडली. मेर्वी येथील विश्वनाथ लिंगायत हा मोटरसायकलवरून निघाला असताना झुडुपागत दबा धरून बसलेल्या बिबट्याने विश्वनाथ लिंगायतवर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यात विश्वनाथ लिंगायत गंभीर जखमी झाला. त्याने हेल्मेटने प्रतिकार करत बिबट्याशी झटापट करून हल्ला परतावला. जखमी अवस्थित विश्वनाथला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

सवा लाखाची मदत
शिवसेना उपनेते म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विश्वनाथ लिंगायत याची रूग्णालयात जाऊन भेट घेतली आणि शासनाच्या वतीने विश्वनाथ लिंगायत याला मदतीचा सवा लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोलदे,जिल्हा वनअधिकारी विजय सुर्वे उपस्थित होते.