
राजेश देशमाने । बुलढाणा
बुलढाण्यातील मोताळा येथून जवळच असलेल्या वडगाव येथील शेतकरी राजू रामधन बावस्कर (वय 40) यांच्यावर आज सकाळी 6 वाजता बिबट्याने हल्ला केला. शेतात कामासाठी जात असताना झालेल्या हल्ल्यातून बावस्कर यांनी कशीबशी स्वत:ची सुटका करून आपला जीव वाचवला.
शेतात मोटार चालू करण्याकरता पायी जात असताना बावस्कर यांच्यावर बिबट्याने झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते घाबरले. मात्र त्यांनी सुटकेचा प्रयत्न सुरू ठेवला. यात बावस्कर यांच्या डोक्याला खूप मोठी जखमी झाली. तसेच मानेला व पोटाला सुद्धा खूप जखमा केला. त्यांनी जखमी अवस्थेत घरी फोन करून माहिती दिली असता गावकरी त्यांच्या मदतीला धावले. गोवकरी आल्यानंतर बिबट्या पळाला. गावकऱ्यांनी जखमी झालेल्या बावस्कर यांना तात्काळ बुलढाणा येथील रुग्णालयात आणले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर वडगाव खंडोपंत गावासह परिसरातील शेतकरी प्रचंड घाबरलेले आहेत. या अगोदर सुद्धा पाळीव प्राणी आणि माणसांवर अशा प्रकारे बिबट्याचे हल्ले झाले असून शेतकरी शेतात जाण्याला सुद्धा घाबरत आहेत.






























































