
ठाण्यातील येऊर जंगलातील खदानीजवळ रस्त्याच्या काही अंतरावर बिबट्याचं पिल्लू आढळले आहे. सकाळी मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या नागरिकांना बिबट्याच्या पिल्लाचा आवाज येत होता. त्यावेळी खदानीजवळ रस्त्याच्या काही अंतरावर बिबट्याच्या पिल्लू आढळले.
बिबट्याचं पिल्लू दिसताच दक्ष नागरिकांनी येऊर येथील वन विभागाच्या चौकीत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी तत्काळ तिथे पोहचून बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले व पिल्लाची रवानगी बोरिवली येथे राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली.




























































