
सामना प्रतिनिधी । नांदेड
ईस्लापुर तालुका किनवट वनपरिक्षेत्रा अंर्तगत येणाया गोंडेमहागाव येथील राखीव जंगलामध्ये बिबट्याने चार जनावरांचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. कक्ष क्रमांक 305 मध्ये एक गाय, तीन वासरे मृतावस्थेत आढळल्याने जंगलामध्ये गुरे चारावयास जाणार्या गुराख्यामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले. तसेच परिसरातील जनते मध्ये घबराटीचे वातावरण पाहावयास मिळत आहे. सदर घटना जंगला मध्ये घडताच गुराख्याने या घटनेची माहिती जनावराच्या मालकांना दिली. या घटनेने हतबल झालेल्या मालकाने ईस्लापुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात येऊन वनरक्षक कूष्णा जाधव व चिखली बिटचे प्रभारी वनपाल बि.एस.भुरके यांना माहिती देताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. व या संर्दभात माहिती घेऊन या बाबत ईस्लापुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पि.के.शिंदे यांना माहिती दिली असता त्यांनी देखील घटनास्थळ गाठले.
सदरील हल्यात गोंडेमहागाव येथील शेतकरी विठ्ठल रामराव चव्हाण, आनंदराव पिराजी खोकले, नुरसिंग जयराम चव्हाण, दता धनुसिंग चव्हाण या चार शेतकर्याची जनावरे मृत पावली. या मध्ये किमान चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाकडुन सदरील नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी वनअधिकारी पि.के.शिंदे यांच्याकडे गोंडेमहागाव येथील शेतकर्यांनी केली आहे.



























































