आता महादेवपूरमध्ये बिबट्याची दहशत, वासराचा फडशा पाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

सामना प्रतिनिधी । नाशिक

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागात बिबटय़ाच्या संचाराने नागरिक धास्तावले आहेत. आता गिरणारेजवळील महादेवपूर येथे त्याने वासराचा फडशा पाडल्याने तेथील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी गंगापूर रोडवरील सावरकरनगरमध्ये चारजणांना जखमी करणाऱया बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर मखमलाबाद, चांदशी शिवारात बिबटय़ाचे दर्शन झाले. शेवगेदारणा परिसरात बिबटय़ाचे बछडे ऊसाच्या शेतात आढळले. दुसऱयाच दिवशी हे बछडे मादी बिबटय़ाने नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाले. आता गुरुवारी रात्री महादेवपूरच्या घोलप वस्तीवर एका वासराचा बिबटय़ाने फडशा पाडला आहे. यामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने पिंजरा लावून बिबटय़ा लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.