
‘आज कारल्याची भाजी करतेय’, असे म्हटले की अनेक जण नाक मुरडतात. चवीला कडू असणारे कारले शरीरासाठी मात्र आवश्यक असते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी कारले खाणे चांगले. कारले खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्याल तर तुम्हीही गोड मनाने ते खायला सुरुवात कराल.
कारल्याने हृदय मजबूत होते.
कारले हे कावीळ आणि हेपिटायटीस यांसारख्या गंभीर आजांरापासून आपल्याला लांब ठेवते.
कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळित होते.
कारल्याने आपल्याला भूकही लागते आणि त्याचबरोबर आपलं वजन कमी होण्यास मदत होते.
कारल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
कारल्याचा रस प्यायल्याने डोळे निरोगी राहतात.
कारले शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवते.




























































