हिवाळ्यात खा ‘हे’ छोटेसे फळ, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 हिवाळ्यात छोटी छोटी हिरव्या, लाल रंगाची आंबट गोड चवीची बोरं बाजारात  आवर्जून दिसतात. लहानसे दिसणारे हे फळ आवर्जून खायला हवं. आरोग्याच्या विविध तक्रारींवर या फळाचा अतिशय चांगला उपयोग होतो. बोरं हा रानमेवा आहे. बोरांचे सगळे प्रकार थंडीच्या दिवसात बाजारात विक्रीसाठी येतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सौंदर्याच्याही समस्यांवर उपाय म्हणून बोर अवश्य खावीत. जाणून घेऊया बोरं खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

  • सी व्हिटॅमिन बोरांमध्ये जास्त प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बोरांचा आहारात आवर्जून समावेश करावा. बोरं खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यामध्ये कीड आहे का ? हे बघूनच ती खावीत.
  •  वजन कमी करणाऱ्यांसाठी बोरं हे अतिशय उत्तम फळ आहे. कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असूनही ऊर्जा जास्त प्रमाणात असते.
  • बोरांमध्ये अँटीॉक्सिडंटसचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. इतकेच नाही तर कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ नये म्हणूनही ही अँटीऑक्सिडंटस उपयुक्त ठरतात.
  • थंडीच्या दिवसांत पचनशक्ती सुधारावी म्हणून बोरं खाणं फायदेशीर ठरतं. इतकंच नाही तर बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या संमस्यांवरही बोरं चांगली असतात.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास बोरं खाण्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळेच मधुमेहींना आवर्जून बोरं खाण्याचा सल्ला दिला जातो.