समाजात ‘केबिन फिवर’ वाढू लागला आहे, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड महामारीदरम्यान लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगनंतर लोकांमध्ये केबिन फिवरची समस्या वाढू लागली आहे. यामुळे लोकं बाह्य जगापासून दूर राहून एकांतात राहणे पसंत करतात. जाणून घेऊया ‘केबिन फिवर’ या आजाराची लक्षणे आणि उपायांविषयी !

हल्ली अनेकांना जीवनशैलीबाबत समस्यांनी ग्रासलेले असते. याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होत असतो. समतोल आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीच्या अभावामुळे नैराश्य, एंग्जायटी, ताणतणाव यासारख्या समस्या यामुळेच निर्माण होतात. ‘केबिन फिवर’ हा असाच एक आजार आहे, हा असाच आजार आहे, ज्यामुळे व्यक्तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. व्यक्तिला एकांतात राहावेसे वाटू लागते. केबिन फिवरमुळे त्रस्त असलेल्या लोकांना बाहेरच्या जगाशी संपर्कात राहू नये, बंदिस्त खोलीत राहाणे, अशा व्यक्तिंना जास्त आवडते. यावर उपाय म्हणजे दैनंदिन जीवनशैलीतील योग्य बदलाव हे आहे. यासाठी पौष्टिक आणि समतोल आहार, दिनचर्या आणि ऋतुचर्येचं पालन, समाजात वावर, व्यायाम, ठरवलेल्या दिनचर्येचं यथायोग्य पालन करणे हा आहे.

केबिन फिवरची कारणे

– बराच काळ लोकांपासून दूर राहिल्याने केबिन फिवरची समस्या निर्माण होऊ शकते. सामाजिक देवाणघेवाण कमी होते. अशा व्यक्तिंना एकटेपणा आवडू लागतो.
– कधी कधी एखाद्या व्यक्तिला दीर्घ आजारामुळे वेगळे राहावे लागते. अशा वेळीही केबिन फिवरची समस्या निर्माण होऊ शकते.
-कोविड या महामारीमुळे सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन यामुळे केबिन फिवरची समस्या अनेक जणांमध्ये वाढल्याचे लक्षात आले आहे.

केबिनची फिवरची लक्षणे

निराशा जाणवणे
केबिन फिवरने ग्रासलेल्या व्यक्तिची प्रेरणा कमी होते. तिच्या मनात नैराश्याची भावना बळावू लागते. अशा व्यक्ती आत्मशंका (सेल्फ डाऊट) घेऊ लागतात. यातून बाहेर पडण्यासाठी सामाजिक स्तरावर संवाद वाढवणे गरजेचे आहे. यामुळे या आजारातून बाहेर पडायला मदत होऊ शकते.

थकवा आणि झोपेसंबंधित समस्या
झोपेच्या वेळा, पद्धतीमध्ये बदल होणे, थकवा जाणवणे, वारंवार झोप घेणे हेदेखील केबिन फिवरचे लक्षण असू शकते. केबिन फिवर झालेल्या व्यक्तिला झोपून राहायला आवडते. झोपेतून उठणेही अशा व्यक्तिला अवघड जाते.