
गव्हाची पोळी जवळपास प्रत्येक घरामध्ये बनवली जाते. लहान मुलांसुद्धा दूध-पोळी खाऊ घातली जाते. बहुतेक जण डब्यात पोळ भाजी घेऊन कार्यालयात जातात, काहींना सकाळी पोळीभाजीचा नाश्ता करण्याची सवय असते. दररोज स्वयंपाकघरात बनवली जाणारी पोळी रात्रीच्या वेळी दुधासोबत खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घेऊया रात्रीच्या वेळी दूध-पोळी खाण्याविषयी –
गव्हाची पोळी आणि दूध यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. जीवनसत्त्वे, मिनरल्स, प्रथिने, कॅल्शियम या पोषक तत्त्वांची शरीरात असणारी कमतरता या पदार्थामुळे भरून निघते. त्यामुळे रात्री घ्यावयाच्या आहारात दूध आणि पोळीचा समावेश केल्याने शरीराला अनेक पौष्टिक घटकांचा लाभ होतो. याशिवाय दूध हा कॅल्शियमचा मुख्य स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त दुधात जीवनसत्त्वे, आयर्न आणि प्रथिनेही असतात, तर पोळीमध्ये सोडियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असतेच तसेच कार्बोहायड्रेट, थायमिन बी1, रायबोफ्लेविन बी 2 आणि नियासिन बी3 हे घटक असतात.
रात्रीच्या वेळी हलका आहार घेणे आवश्यक आहे. याकरिता रात्रीच्या आहारात दूध-पोळी हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे पचनविकाराशी संबंधित त्रासांपासून सुटका होऊ शकते. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस यासारख्या समस्या रात्री दूध-पोळी खाल्ल्याने निर्माण होत नाहीत. याशिवाय आरोग्य निरोगी राहते. मुख्य म्हणजे डायरिया आणि अपचन यासारखे विकार दूध-पोळी खाल्ल्याने फायदा होतो.
दिवसभरातील ताणतणाव दूर होण्याकरिता रात्रीच्या जेवणात हलकीफुलकी पोळी आणि दुधाचे सेवन केल्याने तणावमुक्त राहायला मदत होते. इतर अन्नपदार्थांपेक्षा पोळी तयार करायला वेळही कमी लागतो. हा हलका आहार असल्यामुळे खाल्ल्यानंतर झोपही शांत लागते.
दिवसभरातील कामातील व्यस्ततेमुळे रात्रीच्या थकवा, अशक्तपणा असे त्रास जाणवत असतील तर एक वाटी दूध आणि पोळी खाल्ल्यामुळे अशा प्रकारचे त्रास लवकर कमी व्हायला मदत होऊन शरीराला ऊर्जा मिळते.
दूध-पोळी खाल्ल्याने वजनवाढीवर नियंत्रण येऊन वजन कमी होऊ शकते. याकरिता मल्टीग्रेन पोळी आणि लो फॅट दुधाचे सेवन रात्रीच्या वेळी करू शकता. यामध्ये दूध-पोळीत साखरेऐवजी मध घालू शकता, यामुळे वजन लवकर कमी व्हायला मदत होईल.अशक्त आणि बारीक असलेल्या व्यक्तिंनी पूर्ण फॅटयुक्त दूध आणि गव्हाची पोळी खाल्ल्याने यामधील कॅलरीज, फॅट्स आणि कार्ब्स याचा शरीराला फायदा होऊन वजन वाढायला मदत होईल.

























































