घरच्या घरी करा ‘लिप स्पा’, ओठ होतील गुलाबी आणि मुलायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोमल, मुलायम, गुलाबी आणि लालचुटुक ओठ कोणाला नको असतात. याकरिता ओठांना तूप लावणे, दुधाची साय लावणे, ते काळे पडू नयेत याकरिता काळजी घेणे …असे नाना तऱ्हेचे उपाय आपण करत असतो, आता तर बाजारात महागड्या उपचार पद्धतीही ओठांकरिता उपलब्ध आहेत, मात्र ओठांच्या एक अनोखी, वेगळी आणि घरच्या घरीच करता येण्याजोगा आणि ओठांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवणारा अत्यंत सोपा उपाय म्हणजे ‘लिप स्पा’. घरी लिप स्पा कसे करतात, वाचा याविषयी सविस्तर.

ओठ हा आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील अवयव आहे. मऊ आणि गुलाबी ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते, मात्र अति जागरण, व्यसन करणे किंवा इतर काही कारणांमुळे ओठांवर परिणाम होऊन त्यांचा रंग बदलू शकतो. याकरिता नियमित लिपस्टिक लावण्याची वेळ येते. यामुळे काही वेळा ओठांचे नुकसान होऊ शकते. यासाठी वेळीच ओठांची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे ओठांची नैसर्गिक चमक टिकून राहण्याकरिता घरी लिप स्पा कसा करायचा ते पाहूया.

साहित्य

लिप्स स्पासाठी पेट्रोलियम जेली, मध, दूध, मॉइश्चरायझर, बदाम तेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, मिक्सिंग बाऊल, टिश्यू, टॉवेल, साखरेचे चूर्ण, लिप बाम आणि इसेंशियल ऑईल या साहित्याची आवश्यकता आहे.

कृती

सर्वप्रथम कोमट पाण्याने ओठ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मॉइश्चरायझर आणि दुधाने ओठांना हलक्या हाताने 2 मिनिटे मसाज करा. आता ओठांना स्क्रब लावावा लागेल. यासाठी एका बाऊलमध्ये थोडे मध, व्हिटॅमिन ई, बदामाचे तेल आणि पिठी साखर हे सर्व मिश्रण एकजीव करा. त्यानंतर हे मिश्रण फ्रीजरमध्ये अर्ध्या तासाकरिता ठेवा. अर्ध्या तासाने हे मिश्रण ओठांना लावा. वर्तुळाकार मसाज करा. यामुळे ओठांवरची मृत त्वचा निघून जायला मदत होईल. 10 मिनिटे ओठांना हा मसाज करा. आता आईस क्यूब टिश्यु पेपरमध्ये गुंडाळा आणि ओठांवरून सर्व बाजूने फिरवा.