
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असतात. ते कायम त्यांच्या अकाऊंटवरुन प्रेरणादायी संदेश, क्रिएटिव्ह गोष्टी शेअर करत असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर तोंडात कॅमेरा घेतलेल्या सिंहीणीचा एक फोटो शेअर केला होता आणि त्यावर युजर्सना कॅप्शन विचारली होती आणि सर्वोत्कृष्ट कॅप्शन देणाऱ्याला बक्षिसही देणार असल्याची घोषणा केली होती.आता त्यांनी विजेत्याचे नाव घोषित केले असून त्याला भेटवस्तू स्वरूपात ट्रक दिला आहे.
आनंद महिंद्रा यांनी नुकतेच आपल्या अकाऊंटवरुन एक फोटो ट्विट केले होते. या ट्विटमध्य़े तोंडात कॅमेरा घेतलेल्या सिंहीणीचाफोटो शेअर केला होता. हा फोटो बोत्सवानामध्ये 2018 मध्ये वाइल्डलाईफ फोटोग्राफर बारबरा जेन्सेन वोस्टरने काढला होता. फोटो शेअर करत ट्विटर युजर्सना याला एक फोटोकॅप्शन विचारले होते आणि 9 मे पर्यंत ते द्यायला सांगितले होते. सर्वोत्कृष्ट फोटोकॅप्शनसाठी बक्षिसही देणार असल्याची घोषणा केली होती.
I’ve been reminded that I haven’t done a caption call for quite a while now. So here’s something to compete for your time on a Sunday! Send me your proposed caption for the image of the lioness on the left. And the writer of the best caption—in my opinion—will receive a model… pic.twitter.com/AHOXXa6OlB
— anand mahindra (@anandmahindra) May 7, 2023
आनंद महिंद्रा यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलेय की, मला आठवण करून देण्यात आली की मी काही दिवसांपासून कॅप्शनवाले पोस्ट नाही शेअर केले आहेत. तर इथे तुमच्यासाठी काहीतरी टाईमपास आहे. डावीकडे असलेल्या सिंहिणीच्या फोटोसाठी चांगली कॅप्शन मला पाठवा आणि सर्वात चांगले कॅप्शन लिहीणाऱ्याला महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या फुरिओ मॉडेलचे टॉय ट्रक भेट म्हणून मिळेल. या ट्रकचा फोटोही च्यांनी सिंहीणीच्या फोटोसोबत शेअर केला होता.
Announcing the winner of my most recent caption contest. Congratulations @nimishdubey A clever & compact caption…
Please DM@MahindraRise
to receive your scale model Furio truck…. 👏🏽👏🏽👏🏽 https://t.co/dZzhVVKKuC pic.twitter.com/avl7Ml81Qp— anand mahindra (@anandmahindra) May 10, 2023
आनंद महिंद्रा यांच्या प्रत्येक ट्विटप्रमाणे तोंडात कॅमेरा पकडलेल्या सिंहीणीचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि युजर्स आपआपल्या पद्धतीने आनंद महिंद्रा यांना फोटकॅप्शन पाठवले आहे. आता महिंद्रा यांनी एक फोटोकॅप्शन निवडली आहे आणि ट्वीटच्या माध्यमातून विजेत्याचे नाव जाहीर केले आहे. त्यांनी त्यांच्या लेटेस्ट ट्विटमध्ये लिहीलेय की,. माझ्या सगळ्यात अलिकडील फोटो कॅप्शनचा विजेता घोषित करत आहे….अभिनंदन @nimishdubey. त्याने , ‘Say cheese. Or I will say ‘lunch’, ही फोटोकॅप्शन दिली होती. चांगली आणि संक्षिप्त कॅप्शन दिल्याबद्दल तुम्हाला स्केल मॉडेल फ्युरियो ट्रक भेट देण्यात येणार आहे. आनंद महिंद्रा यांचे ट्विटरवर प्रचंड चाहते असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 10.4 दशलक्ष आहे.























































