
आपण जेव्हा वाण्याच्या दुकानात जातो तेव्हा तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीवरील एक लेबल पाहतो. यावर ‘बेस्ट बिफोर’ची तारीख लिहिलेली असते, अर्थात एका विशिष्ट तारखेपर्यंतच ही वस्तू वापरण्यायोग्य आहे असा याचा अर्थ आहे. परंतु नेहमीच प्रत्येक वस्तू एका विशिष्ट तारखेपर्यंत किंवा महिन्यापर्यंत वापरण्यायोग्य असेलच असे नाही. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी या वर्षानुवर्ष देखील वापरल्या जाऊ शकतात आणि त्याचे साईड इफेक्टही नसतात. आज आपण अशाच काही गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत.
मिठ –
चवीसाठी आवश्यत मिठाचा वापर भाज्या, डाळी, कोशिंबिरी यासह खाण्याच्या प्रत्येक पदार्थात केला जातो. खाद्यपदार्थांची चव वाढवणाऱ्या मिठाचा वापर अन्य खाद्यपदार्थ वर्षानुवर्ष स्टोअर करण्यासाठी केला जातो. तसेच मिठ योग्य पद्धतीने स्टोअर करून ठेवल्यास वर्षानुवर्ष ते खराब होत नाही आणि त्याची चवही बदलत नाही.
पांढरे तांदुळ –
तांदळाचा वापर खिचडी, भात, बिर्याणी, पुलाव आणि खिरसाठीही होतो. तांदुळ शक्यतो हवाबंद डब्यात स्टोअर केले पाहिजे. हवा लागल्यास तांदुळ खराब होतात. तांदुळ वर्षानुवर्ष तुम्ही स्टोअर करू शकता आणि हवे तेव्हा वापरू शकता.
डाळी –
हिंदुस्थानी लोकांचा मुख्य आहार असणाऱ्या डाळींचा वापर प्रत्येक घरात केला जातो. डाळींना वेळोवेळी ऊन दाखवले तर त्या वर्षानुवर्ष स्टोअर करू शकता.
साखर –
मिठाप्रमाणे साखरेचा वापर देखील किचनमध्ये दररोज केला जातो. योग्य प्रकारे स्टोअर केल्यास आणि ओल्या चमच्याचा वापर न केल्यास साखर वर्षानुवर्ष तशीच राहू शकते. वर्षानुवर्ष स्टोअर केल्यानंतरही तिच्या गोडीत बदल होणार नाही.
मध –
मध देखील वर्षानुवर्ष स्टोअर केला तरी तो शिळा होत नाही. मात्र यासाठी मध शुद्ध हवा. तसेच बराच काळ स्टोअर केलेला मध घट्ट झाल्यास सिलबंद कंटेनरला गरम पाण्यामध्ये ठेवा आणि 10 ते 15 मिनिटात मध वापरायोग्य होईल.
Tips – पावसाळ्याच्या दिवसात ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी
सोया सॉस –
आशियाई रेस्टॉरंट आणि चायनिज गाड्यांवर सोया सॉस मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सोया सॉसची बॉटल न खोलता तशीच ठेवली तर ती वर्षानुवर्ष तशीच राहू शकतो. फ्रिजमध्येही हे सॉस 2-3 वर्ष स्टोअर केले जाऊ शकतो.
कॉर्नस्टार्च –
कॉर्नस्टार्चचा उपयोग ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी, सॉस किंवा सूप बनवण्यासाठी केला जातो. यालाही बराच काळ स्टोअर केले जाऊ शकते. हवाबंद डब्यात ठेवल्यास कॉर्नस्टार्च देखील बराच काळ चांगले राहते.
व्हिनेगर –
व्हिनेगरला देखील एक्स्पायरी डेट नसते. मिठाप्रमाणे याचा देखील वापर खाद्य पदार्थांना स्टोअर करण्यासाठी केला जातो. फ्रिज शिवाय देखील तुम्ही व्हिनेगर वर्षानुवर्ष स्टोअर करू शकता.




























































