Live – आरे कारशेडच्या कामाला स्थगिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

4520

cm-uddhav-thackeray

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक संपल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी आपली दुसरी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देत असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. वाचा या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

 • माझा भगवा हा जन्मभराचा आवडता रंग आहे आणि कोणत्याही लाँड्रीत हा धुतला जाणार नाही
 • रातोरात झालेली झाडांची कत्तल मंजूर नाही.
 • आपल्या हातातलं वैभव गमावून जर काही कमवत असू तर तो आपला विकास नाही.
 • या प्रकरणाचं पुनर्अवलोकन केल्याशिवाय या कामाची सुरुवात नाही.
 • मेट्रोला स्थगिती नाही, फक्त आरे कारशेड झाडचं काय तर पानही तोडता येणार नाही- मुख्यमंत्री
 • आरे कारशेडच्या कामाला स्थगिती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
 • मुंबईत जन्मलेला मी पहिला मुख्यमंत्री आहे. माझी मुंबई म्हटलं तर तिच्यासाठी काय करायचं हा विचार मी करत आहे.
 • हे सरकार लोकांशी नम्रतेने वागेल. खर्च होणारा पैसा जनतेचा पैसा आहे. मला प्रत्येक पैशाचं उत्तरदायित्व घ्यायचं आहे. आपलं सरकार म्हणून याचं उत्तरदायित्व घ्यायचं आहे.
 • सचिवांची बैठक झाली, त्यांच्याशी एक ओळख झाली. हे माझंच नाही, तर आपल्या सर्वांचं सरकार आहे.
 • अंमलबजावणी झाली किंवा नाही, अडचणी काय आहेत, त्याबाबत तुम्हीच आम्हाला मदत करू शकता.
 • सरकारकडून घोषणा होते, पण अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे तुम्ही अंमलबजावणी झाली किंवा नाही, याची माहिती दिली पाहिजे.
 • पत्रकारिता म्हणजे नुसतं ओरबाडणं नव्हे. आपण पत्रकार सरकारचे नाक, कान, डोळे झालं पाहिजे.
 • माझ्या हातात जुना मार्मिकचा अंक आहे, मुखपृष्ठ मात्र आजही समान आहे, महागाई आणि टंचाई वगैरे, याचा सामना आम्हाला करायचा आहे.
 • मला माहितीये की हे आव्हान मोठं आहे.
 • मी जबाबदारी सोडून पळालो असतो, तर शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून नालायक ठरलो असतो
 • आपण, आमच्या कुटुंबाला ओळखता, आम्ही कधीच स्वतःसाठी मागितलं नाही.
 • मी मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे आलो आहे.
 • मी पत्रकार किती होतो, किंवा आहे या पेक्षा या जागेशी आमचे ऋणानुबंध आहेत.
 • या पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरेही उपस्थित
 • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यालयाला भेट दिली असतानाचा फोटोही मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आला.
 • विधिमंडळ वार्ताहर संघाकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरे यांचा सन्मान
 • विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद होणार आहे.
 • राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक संपली, महत्त्वाच्या निर्णयाची उत्सुकता
 • सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत हे देखील उपस्थित
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोबाईलमध्ये छबी टिपण्यासाठी गर्दी
 • उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, मंत्रालयात घोषणा
 • छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणांनी मंत्रालय दणाणले
 • उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला
 • मंत्रालयातील कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं औक्षण
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले
 • शिवसैनिकांसह नागरिकांची गर्दी
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना वंदन केलं
 • शिवसेना नेते एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, मुंबईच्या महापौर देखील उपस्थित
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा चौकात पोहोचले
 • मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी लोकांची हुतात्मा चौकात प्रचंड गर्दी जमली
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा चौकात अभिवादन करणार
 • उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज
 • आज मंत्रालयात पदभार स्वीकारणार
 • कॅबिनेटची बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली
 • उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
आपली प्रतिक्रिया द्या