रेल्वे गाड्यांमधील किचन लाइव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन । मुंबई

प्रवाशांच्या मनात रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असते. पण यापुढे रेल्वेमध्ये जेवण कसे तयार होते ते प्रवाशांना पाहता येणार आहे. आयआरसीटीसीने रेल्वे गाडय़ांमधील किचन प्रवाशांसमोर लाइव्ह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लाइव्ह स्ट्रिमिंग मॅकेनिजम’ हे तंत्र आयआरसीटीसीने विकसित केल्याने रेल्वे गाडय़ांमध्ये मिळणारे जेवण कसे तयार केले जाते ते प्रवाशांना कळणार आहे.रेल्वेत मिळणारे जेवण कसे तयार केले जाते, ते तयार करताना स्वच्छता राखली जाते का, याची उत्तरे आता प्रवाशांना या तंत्रामुळे मिळणार आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या सूचनेनंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरील लाइव्ह स्ट्रिमिंग सेवेचे उद्घाटन केले. वेबसाइटवरील गॅलरी सेक्शनमध्ये या व्हिडीओची लिंक शेअर केली जाईल. यामुळे खाद्यपदार्थ नेमके कसे तयार केले गेले हे प्रवाशांना अगदी सहज पाहता येणार आहे.