
राष्ट्रीय लोकअदालतीत 2293 प्रकरणे तडजोडीने निकाली काढून 32 कोटी 49 लाख 73 हजार 608 रुपये वसुली करण्यात आली. एकूण 4397 प्रकरणे तडजोडीने निकालात काढण्यात आली.
राष्ट्रीय लोकअदालतीचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यासमवेत जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे, शरद पवार, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, मुख्य न्यायदंडाधिकारी राठोड, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. बी. देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अरुण खोत उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 16,139 प्रलंबित प्रकरणे तसेच सामा इन्स्टिट्यूटमार्फत 268 ऑनलाइन आभासी प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित प्रकरणे 2293 तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण 32 कोटी 49 लाख 73 हजार 608 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. तसेच, वादपूर्व 871 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली.
वादपूर्व प्रकरणामध्ये एवूâण सात कोटी 96 लाख 44 हजार 814 एवढी रक्कम वसूल करण्यात आली. लोकअदालतीत एकूण 3163 प्रकरणे निकाली निघाली. स्पेशल ड्राइव्हमध्ये 1234 प्रकरणे निकाली काढण्यात आली. अदालतीत एवूâण 4397 प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.


































































