Lok sabha 2019 छाननीमध्ये नागपुरातील 6 तर रामटेकमधील 3 उमेदवारांचे अर्ज रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर आणि रामटेक मतदार संघात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांपैकी नऊ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये रद्द झाले आहेत. यात नागपूर मतदार संघातील सहा तर रामटेक मतदार संघातील तीन उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघातील पिपल पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. छाननीनंतर रामटेक मतदारसंघात 20 तकर नागपूर मतदारसंघात 33 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

नागपूर मतदारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीमध्ये झाली. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील छाननी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांच्या उपस्थितीत पार पडली.

रामटेकमध्ये अर्ज रद्द झालेल्या उमेदवारांचे नाव –
1. तुमाने गोपाल अजाबराव (अपक्ष)
2. दिपचंद शेंडे (अपक्ष)
3. मिनाताई करणसिंह मोटघरे

नागपूरमध्ये अर्ज रद्द झालेल्या उमेदवारांचे नाव –
1. खुशबू बेलेकर (बळीराजा पार्टी)
2. आनंदराव खोब्रागडे (अपक्ष)
3. मंसूर जयदेव शेंडे (अपक्ष)
4. निलेश महादेव ढोके (अपक्ष)
5. जोगेश रमेश जयस्वाल (विश्वशक्ती पार्टी)
6. कृष्मराव निमजे (अपक्ष, 2 अर्ज)