
सामना ऑनलाईन, मुंबई
- राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करायचा का, याबाबत पक्ष ठरवेल ती भूमिका घेईन
- भाजप प्रवेशाबाबत सुजय यांनी माझ्याशी चर्चा केली नाही
- मी नगर मतदारसंघात कोणाच्याच प्रचाराला जाणार नाही
- शरद पवारांच्या मनात विखे कुटुंबीयांबद्दल द्वेष आहे
- राधाकृष्ण विखे-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही
- पक्षश्रेष्ठींना भेटणार आहे, तो निर्णय घेतील तो मला मान्य असेल
- बाळासाहेब थोरांना स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही, ते हायकमांड नाही
- आघाडी धर्माला गालबोट लागेल असं मी कधी वागलेलो नाही
- आजोबांबाबतचे विधान झाल्यानंतर सुजय यांनी त्यांचा निर्णय घेतला
- हयात नसताना वडिलांबद्दल टीप्पणी करणं ज्येष्ठ नेत्याने करणं किती योग्य आहे?
- शरद पवारांनी माझ्या वडीलांबाबत बोलणं चूक होतं, मला व्यक्तिश: वाईट वाटलं
- 3 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा नगर मतदारसंघात पराभव झाला होता
- काँग्रेसने मागितलेल्या जागांमध्ये नगरच्या जागेचा समावेश होता
- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटाघाटी सुरू असताना काँग्रेसने आम्ही काही जागांची मागणी केली
- राधाकृष्ण विखे-पाटील पुन्हा पत्रकार परिषदेला आले
- काही सेकंदातच ते खुर्चीतून उठून निघून गेले
- राधाकृष्ण विखे-पाटील पत्रकार परिषदेला येऊन बसले
- विखे-पाटील त्यांची भूमिका आज स्पष्ट करणार
- राधाकृष्ण विखे-पाटील राजीनामा देणार असल्याची जबरदस्त चर्चा
- मुलगा भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मीडियाशी संवाद साधणार
- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पत्रकार परिषद






























































