Lok sabha 2019 : निवडणुकीवर कारखेल बुद्रुक ग्रामस्थांचा बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आष्टी

अनेक दिवसापासून सांगवी फाटा ते कारखेल बुद्रुक येथील रस्ता डांबरीकरण होत नसल्याने हा रस्ता तात्काळ करण्यात या मागणीसाठी कारखेल बु. येथील ग्रामस्थांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आष्टीचे तहसिलदार यांना लेखी निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील कारखेल बु. येथील सांगवी फाटा ते कारखेल बु. हा 5 कि.मी. चा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.

स्वातंत्र मिळाल्यापासून अद्यापर्यंत हा रस्ता दुर्लक्षीत आहे. या रस्त्याने वाहन घेऊन जाताना आधी खड्डे चुकवत वाहन चालवाने लागते त्यामुळे वृध्द, गर्भवती महिला यांना दवाखान्यात घेऊन जातांना अनेक अडचणींना सामोरेज जावे लागत आहे. सुमारे 2500 लोकसंख्येचे हे गाव असुन लोकप्रतिनिधींचे या कडे दुर्लक्ष आहे. रस्ता कामाचे डांबरीकरणांचे काम सुरु करा, अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे येथील नागरीकांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी सोमनाथ पवार, गणेश पवार, बाबासाहेब पवार, लक्ष्मण कव्हळे, पांडुरंग बोरसे, किशोर पवार, अंबादास बोरसे, समाधान पवार, सचितानंद पवार, योगेश पवार, आदी ग्रामस्थांच्या सहया आहेत.