पाकिस्तानची सपशेल शरणागती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी देण्याचा विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरचा निर्णय अतिशय रास्त ठरला. पाकिस्तानकडून फखर झमान (22), बाबर आझम (22), मोहम्मद हाफिज (16) व तळाला वहाब रियाझ (18) यांनाच दुहेरी धावा करता आल्या. विंडीजच्या पॉवरफुल गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या इतर फलंदाजांची बत्ती गुल झाली. इमाम उल-हक (2), हारिस सोहिल (8), कर्णधार सर्फराज अहमद (8), इमाद वसिम (1) ही आघाडीची आणि मधली फळी केवळ हजेरीवीर ठरली. विंडीजकडून ऑश्ने थॉमसने 27 धावांत 4, तर कर्णधार जेसन होल्डरने 42 धावांत 3 फलंदाज बाद करून पाकिस्तानची फलंदाजी गारद केली. आंद्रे रसेलने 2, तर शेल्डोन कॉटरेलने 1 गडी बाद केला.

पाकिस्तानची विश्वचषक स्पर्धेतील ही वैयक्तिक दुसऱया क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली. याआधी 1992 च्या विश्वचषक स्पर्धेत ऍडलेडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या लढतीत पाकिस्तानचा 40.2 षटकांत 74 धावांत खुर्दा उडाला होता. पाकिस्तानला 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडने 45.4 षटकांत 132 धावांवर, तर 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने 39 षटकांत 132 धावांवर रोखले होते.

धावफलक

पाकिस्तान- इमाम उल हक झे. होप्स गो. कॉटरेल 2, फखर झमान त्रि. गो. आंद्रे रसेल 22, बाबर आझम झे. होप गो. थॉमस 22, हारिस सोहिल झे. होप गो. रसेल 8, सर्फराज अहमद झे. होप गो. होल्डर 8, मोहम्मद हाफिज झे. कॉटरेल गो. थॉमस 16, इमाद वसिम झे. गेल गो. होल्डर 1, शाबाद खान पायचित गो. थॉमस 0, हसन अली झे. कॉटरेल गो. होल्डर 1, वहाब रियाझ त्रि. गो. थॉमस 18, मोहम्मद आमिर नाबाद 3. अवांतर ः 4, एकूण ः 21.4 षटकांत 105 धावा. बाद क्रम , 1-17, 2-35, 3-45, 4-62, 5-75, 6-77, 7-78, 8-81, 9-83, 10-105. गोलंदाजी, शेल्डोन कॉटरेल 4-0-18-1, जेसन होल्डर 5-0-42-3, आंद्रे रसेल 3-1-4-2, ऑश्ने थॉमस 5.4-0-27-4, कार्लोस ब्रेथवेट 4-0-14-0.

वेस्ट इंडीज- ख्रिस गेल झे. खान गो. आमीर 50, शाई होप झे. हाफिज गो. आमीर 11, डॅरेन ब्राव्हो झे. बाबर गो. आमिर 0, निकोलस पुरन नाबाद 34, सिमरोन हेटमायर नाबाद 7. अवांतर 6, एकूण 13.4 षटकांत 3 बाद 108 धावा. बाद क्रम 1-36, 2-46, 3-77. गोलंदाजी ः मोहम्मद आमीर 6-0-26-3, हसन अली 4-0-39-0, वहाब रियाझ 3.4-1-40-0.