नगर- लोणी गावात गोळीबार, एका तरुणाचा मृत्यू

1027

राहाता तालुक्यातील लोणी गावामध्ये श्रीरामपूरच्या तरुणावर गोळीबाराचा एक धक्कादायक प्रकार झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.

या घटनेतील मृत तरुणाचं नाव फरदीन अब्बू कुरेशी (18, रा. श्रीरामपूर) असे आहे. आशा अब्बू कुरेशी (रा. श्रीरामपूर) याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून संतोष सुरेश कांबळे, सिराज उर्फ सोल्जर अय्युब शेख, शाहरूख शहा गाठन (सर्व रा. श्रीरामपूर वॉर्ड नं 2) व उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम (सर्व रा. लोणी, ता. राहाता) या सात आरोपी विरोधात लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार रविवारी रात्री नऊच्या सुमारास लोणी येथे गोळीबार केला. यामध्ये गोळी लागून खोलवर जखम झाल्यामुळे कुरेशीचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत कुरेशीला आरोपी संतोष सुरेश कांबळे, सिराफ उर्फ सोल्जर आयुब शेख, शाहरुख शहा गाठन यांनी नाशिक येथे सोबत येण्याबाबत जबरदस्ती करून धमकी दिली. त्याला जबरदस्ती घेऊन जाऊन त्यानंतर लोणी इथे आणून त्याच्यासोबत असलेले आरोपी उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम यांनी मिळून वैयक्तिक वादाच्या कारणावरून बंदुकीची गोळी मारून फरदीन कुरेशीला गंभीर जखमी करून त्याची हत्या केली.

घटनेनंतर याच आरोपींनी त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. यातील काही आरोपी नुकतेच जेलमधून बाहेर आल्याची चर्चा गावात आहे. घटनेनंतर जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक इशू सिंधू, शिर्डीचे सागर पाटील श्रीरामपूरच्या काळे मॅडम, एलसीबीचे दिलीप पवार, लोणीचे सपोनि प्रकाश पाटील, पोलिस सहनिरीक्षक सूर्यवंशी आदींनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. व कलम 0359/ 2019 भादवी कलम 302,143,147,148,149,506,34 आर्म अक्त 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या