मोक्कातील दोन फरार आरोपी जेरबंद, बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मोक्का’ कारवाईनंतर पसार झालेल्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपी हे मागील काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होते. अनिल रमेश चव्हाण (21,रा. बिबवेवाडी), रोहीत हेमंद बोदरे (20,रा. कोंढवा रोड) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

चव्हाण आणि त्याच्या साथीदारांवर शहर परिसरात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी सात जणांना अटक देखील केली आहे. मात्र, कारवाई झाल्यापासून चव्हाण आणि बोदरे हे फरार झाले होते.

बिबवेवाडी पोलीस आरोपींच्या मागावर असताना आरोपी बोदरे हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, अंमलदार अतुल महांगडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.