बारा लाख रुपयांची खंडणी मागितली; मदरशाच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किल्लारी

संस्थाचालकाच्या व्हिडिओ बनवून 12 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी मदरशाच्या शिक्षक आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्लारीजवळच असलेल्या लामजना येथील अरबी मदरशात शिकवत असलेल्या मुक्ती इम्रान नवाज सय्यद या शिक्षकाने संगनमत करुन अरबी मदरसाचा संस्थाचालक (मुप्ती वाजीद अब्दुल माजीद शेख) यांचा मसाज करून घेतानाचा 7 डिसेंबर 2018 ते 15 जानेवारी 2019 या काळातला विडिओ बनवला.

हा व्हडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संस्थाचालकाकडे 12 लाख रुपये खंडणी मागितली. आपल्याला शाळेचा मालक बनवण्याची मागणीही त्याने केली. मागणी मान्य केली नाही तर ते व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली. व्हिडिओद्वारे सर्वत्र बदनामी करण्याची धमकी देऊन तो सातत्याने खंडणी मागत होता. तसेच याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार संस्थाचालक मुप्ती वाजीद अब्दुल माजीद शेख यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन शिक्षक मुक्ती इम्रान नवाज सय्यद, सय्यद मैनौद्दीन फय्याजौद्दीन, ताहीर शेख यांच्याविरुध्द किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.