
जगज्जेत्या हिंदुस्थानच्या डी. गुकेशला नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीत अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. या विजयासह कार्लसनने संपूर्ण तीन गुणांची कमाई केली. पाच वेळचा जगज्जेत्या यजमान देशाच्या कार्लसनला 18 वर्षीय गुकेशने चार तासाहून अधिक वेळ झुंजविले. या क्लासिक गेममध्ये त्याने 34 वर्षीय कार्लसनवर दबाव आणला होता, मात्र नंतर झालेली एक चूक गुकेशला महागात पडली. त्यामुळे कार्लसनला 55 चालीत विजय मिळविता आला. या विजयासह कार्लसन अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. नाकामुराने आपलाच देशसहकारी फॅबियानो कारूआना याचा पराभव केला. आता दुसऱया फेरीत डी. गुकेशची गाठ आपलाच देशसहकारी अर्जुन ऑरिगॅसीशी पडेल, तर कार्लसनची लढत हिकारू नाकामुराशी असेल. अर्जुन ऑरिगॅसीने सलामीच्या लढतीत चीनच्या वेई यी याचा पराभव केला.