
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणी आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रग्जची नशा’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर ड्रग्जने तरुणाई उध्वस्त करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, तरुणाईला नशेच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ड्रग्ज माफियांवर कारवाई न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.
हिवाळी अधिवेशन दिवस आठवा
राज्यात सापडलेले ड्रग्सचे अवैध कारखाने,ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आम्ही आमदारांनी जोरदार आंदोलन करत केले. #हिवाळीअधिवेशन२०२३#शिवसेनाउबाठा#महाविकासआघाडी… pic.twitter.com/mztC3morOU
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 18, 2023
नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले.
‘रुग्णालयाचे डीन आहेत की ड्रग्ज डीलर, सबका कातील ललित पाटील, ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा, उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र, सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रग्जची नशा अशा विविध घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले



























































