
सोमवार, 18 जुलै पासून सुरू होणारे विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला याबाबत सूचित केल्यानंतर दोन्ही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांना अधिवेशन पुढे ढकलल्याचे कळविण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून देण्यात आली आहे.




























































