
महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या आडून राजकारण करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. हा त्यांचा बालीशपणा आहे. दोन वर्षांनंतर लोक सणवार साजरे करीत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून लोकांना सणाचा आनंद घेऊ द्या, अशा शब्दांत शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज भाजपवर हल्ला चढवला.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कुलाबा येथील ‘पर्ह्टचा राजा’ व चंदनवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जे कोणी राजकारण करत आहेत त्यांचा तो बालीशपणा आहे. इतपं राजकारण झालं तर लोकांना राजकारणाचा पंटाळा येईल. राजकारण बाजूला ठेवून लोकांना सणांचा आनंद घेऊ द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱयाने कामाठीपुरा आठवी गल्ली येथे 57 वर्षीय महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी- कार्यकर्त्याने असे करणे योग्य नाही. एखाद्या महिलेवर असा हात उचलणे योग्य नाही. त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई लोकांना दिसली पाहिजे.































































