
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांना गेल्या वर्षी जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.
Maharashtra Minister Dhananjay Munde tests positive for COVID19 pic.twitter.com/Gki7PLw4ff
— ANI (@ANI) March 23, 2021
‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी’, असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.
आदित्य ठाकरे देखील कोरोना पॉझिटिव्ह
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली होती. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केलेले. 20 मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी जाहीर केले होते.































































