पॉलिटेक्निकचे प्रवेश आजपासून, एक लाख 10 हजार जागा उपलब्ध

दहावीनंतरच्या इंजिनीअरिंग डिप्लोमा (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून (20 मे) सुरू होत आहे. राज्यात सुमारे 400 पॉलिटेक्निक संस्था असून यात तब्बल 1 लाख 10 हजार जागा उपलब्ध आहेत. या जागांकरिता हे प्रवेश केले जाणार आहेत.

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय आहे. अल्पकालावधीत तांत्रिक काwशल्य मिळवून रोजगार किंवा उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण महत्त्वाचे ठरते. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षमतांनी सज्ज करणाऱया या अभ्यासक्रमामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वास्तुकला विषयक तीन वर्षं कालावधीचे हे पदविका अभ्यासक्रम आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशील, वेळापत्रक, नाव नोंदणी व अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.