
एप्रिलपासून लागू करण्यात आलेले कडक निर्बंध 1 जूननंतर उठणार का, याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी अद्यापही काही जिल्ह्यांत ही संख्या अधिक आहे. त्यामुळे 1 जूननंतरही राज्यात निर्बंध कायम राहणार आहेत. मात्र काही ज्या जिल्ह्यांत रुग्णसंख्या आणि मृत्यू कमी आहेत, अशा ठिकाणी नियम काही प्रमाणात शिथिल केले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
अद्यापही कोरोनाचं संकट मात्र टळलेलं नाही. त्यामुळे प्रशासनाकडून अतिशय सावधगिरीनं पावलं उचलण्यात येणार आहेत. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱया आणि मृतांचा आकडा कमी असणाऱया जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.




























































