नगरमधील शिवसेनेचे नगरसेवक फुटले तर काळे फासणार, स्मिता आष्टेकर यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरमधील शिवसेनेचे काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पण त्या नगरसेवकांनी स्मिता आष्टेकरला विसरू नये. ते जर फुटले तर यापुढे ते जेथे दिसतील तेथे त्यांच्या तोंडाला काळे फासू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नगरमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही मुंबईत जाऊन काळे फासू, असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या स्मिता आष्टेकर यांनी दिला आहे.

नगर शिवसेना पदाधिकाऱयांच्या बैठकीनंतर स्मिता आष्टेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना इशारा दिला. नगरमधील एकाही नगरसेवकाने शिवसेनेशी आणि ठाकरे कुटुंबाशी गद्दारी केली तर ती सहन करणार नाही. सन 2008 मध्ये नगरपंचायत समितीच्या शिवसेनेच्या महिला सभापतीने गद्दारी केली होती, तर याच स्मिता आष्टेकरने तिच्या तोंडात शेण घातले होते, हे कोणी विसरू नये, असा इशाराही त्यांनी दिला.