दहावीच्या विद्यार्थ्यांना 11 जून रोजी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे. 27 मे रोजी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्यानंतर विद्यार्थी मूळ गुणपत्रिका मिळण्याची वाट पाहत होते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळामार्फत शाळांना सकाळी 11 वाजता गुणपत्रिका देण्यात येणार आहे.